Saturday, January 21, 2012

अभिनेता

`अभिनेता` ही १९६० ते १९८० या कालखंडात प्रभाव टाकणा-या अभिनेत्यांची एक मालिका आहे. या काळाचं वैशिष्ट्य म्हणजे नायकांची मक्तेदारी..नायिकांचं महत्व कमी होत गेलं. `लार्जर दॅन लाईफ`, असं नायकांचं व्यक्तिमत्व रुपेरी पडद्यावर दिसू लागलं. सुपरस्टार या पदवीचा जन्म झाला.
बदलती जीवनमुल्ये हे या काळाचं वेशिष्ट्य. मारधाड, ग्लॅमरचा झगमगाट, रंगांची उधळण यांतूनही निवडक अभिनेत्यांनी खूप काही दिलं. अशा अभिनेत्यांच्या रुपेरी कारकिर्दीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप...




आराधनाचं सुवर्णमहात्सवी यश सगळ्यांनाच थक्क करुन गेलं... खुद्द शक्ती सामंतांनासुध्दा यापूर्वी एवढं बुलंद य़श कधीच लाभलं नव्हतं. शर्मिलाचा ह्दयस्पर्शी अभिनय आणि राजेश खन्नाचं प्रसन्न, उमदं, आकर्षक व्यक्तीमत्व..यातून प्रेक्षकांवर जादुर्इ असर झाला. सचिनदेव बर्मनची एकापेक्षा एक सरस गाणी. दार्जींलिंगचं निसर्गसौंदर्य. लता आणि किशोरकुमार यांची उदात्त मंगल स्वरातली गीते..यातून तर आराधनाची क्रेझ निर्माण झाली.
राजेश खन्नाचा आधीचा लाजरा-बुजरा फौजी प्रमी आणि मध्यंतरानंतरचा आक्रमक, जलद गतीने संवाद बोलणारा, आत्मविश्वासाने रसरसलेला जिगरबाज तरुण नव्या तरुण –तरुणींना एक विलक्षण हिस्टेरिया देऊन गेला.




लेखक- सदानंद गोखले
पृष्ठे- २६८
किंमत- तीनशे ऱुपये.
मुखपृष्ठ- सुहास चांडक

अनैतिक

`तुमची पत्नी होण्याचं भाग्य मला लाभलं नाही,
तरी तुमची प्रेयसी म्हणूनसुध्दा आयुष्यावर अभिमानानं जगेन मी.
काय नैतीक अन् काय अनैतिक ते जगाला खुशाल ठरवू देत.
मी एवढंच सांगेल, तुमच्या सहवासाची ओढही माझ्या मनाचीही सुंदर तहान आहे
आणि ती तृप्त करण्यासाटी ऊभ्या आयुष्याचा सुध्दा सौदा करायला तयार आहे मी`.


स्त्री-पुरुष संबंधातील तथाकथित `नैतिकते` च्या संकल्पनेवर प्रश्नचिन्ह ऊभं करणारं
एक खरंखुरं नैतिक नाटक...


अनैतिक
लेखक- शिवराज गोर्ले
पृष्ठे- ७२
किंमत- साठ रुपये फक्त.
मुखपृष्ठ- हेमंत देशपांडे

मृत्यू नंतरचे जीवन..

मृत्यूनंतरच्या अदभूत जीवनाचे रहस्य



माझा बेंगलोरचा मित्र सांगू लागला..
बंगलोर येथे हा घडलेली खरीखुरी हकीगत आहे. आमच्या शेजारी शामराव नावाचे एक व्यापारी राहात. त्यांचा व आमचा चांगला घरोबा होता. त्यांची पत्नी अपघातामध्ये दगावली. तिला सात वर्षाचा एक मुलगा होता. नंतर त्यांनी दुसर लग्न केले. योगायोगाची गोष्ट अशी की दोन वर्षांनी शामराव सुध्दा मोटार अपघातात निधन पावले. त्यांची अफाट संपत्ती होती. त्यांच्या मुलगा मनीष माझ्याकडे नेहमी यायाचा. शामराव जाऊन फक्त आठ दिवस झाले होते. मनीष मला म्हणाला...
काका, मला स्वप्नात बाबा दिसले. मी, आई व बाबा फिरायला गेलो आहोत. मी व आई बगीच्यामध्ये बेंचवर बसतो. आई मला पेढे खायला देते. पण बाबा ओरडून सांगतात की, मनीष, हे पेढे खाऊ नकोस. बाबा परत परत मला पेढे खाऊ नकोस म्हणून सांगत असतात व मी जागा होतो.
`मनीष, हे बघ जर तुला आईने कुठेही पेढे दिले तर मुळीच खाऊ नकोस. ते मला आणून दे. मी तुला मिठाईचे बॉक्स देईन`.
माझे वडील म्हणाले, ते पण मनीषचे बोलणे ऐकत होते. मला पण वडिलांचे म्हणणे पटले. मनीषला धोका असल्याची कुठेतरी पुसटशी जाणीव झाली.
आश्चर्य असे की त्याच दिवशी संध्याकाळी त्याच्या आईने त्याला बगीच्यात नेले व पेढे दिले. मनीषने ते न खाता गुपचूप खिशामध्ये ठेवले. त्याची आई त्याला पेढे देऊन हळूच निघून गेली होती. मनीष आमच्या घरी आला व त्याने ते पेढे माझ्या वडिलांकडे दिले. ते पेढे प्रयोगशाळेत पाठविण्यापूर्वी दोन पेढे रस्तावरच्या बेवारशी कुत्र्याला घालून पाहिले, तेव्हा ते कुत्रे पेढे पहिल्यांदा खाईना. जरा वेळाने त्याने खाल्ले पण काही तासामध्ये ते कुत्रे मेले. पेढ्यांमध्ये विष होते हे सिद्द झाले.
स्वप्नात येऊन त्याच्या मयत बापाने त्याला सूचना केली व आपल्या मुलाचा प्राण वाचवला.

मेलेल्या व्यक्तीचा आत्मा आपल्या आवडीच्या आप्त मंडळीत अडकलेला असतो. ते कधी कधी स्वप्नात य़ेऊन त्याला हितकारक सूचना करतात. जर कुणी अडचणीत सापडले तर त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात.

(पुस्तकातील `स्वप्नातील मृतात्मे`... यातील हा काही भाग..)

लेखक- डॉ. किशोरी सुरेंद्र पै
प्रा. महेश सुरेंद्र पै
पृष्ठे- ७८
किंमत- साठ रुपये फक्त
मुखपृष्ठ- विजय मराठे

Friday, January 20, 2012

शेख चिल्लीची फुल्ल २ धम्माल..

विनोदी गोष्टी ऐकायला, वाचायला सा-यांनाच खूप खूप आवडतं, म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आणली आहे,
`शेख चिल्लीची फुल्ल २ धम्माल`...

शेखचिल्लीचं वागणं, बोलणं, त्याच्या जीवनातील विविधांगी प्रसंग, त्यातून निर्माण झालेला हळुवार विनोद या पुस्तकात मजेशीररित्या मांडलेला आहे.

या धम्माल गोष्टीतून सा-यांनाच चतुराई, अफलातूनपणा, हजरजबाबीपणा, प्रसंगावधान इत्यादी कलागुणांचा परिचय विविध प्रसंगातून आपोआपच होईल.

या मजेशील धम्माल गोष्टी लहान मुलांना तर आवडतीलच
तसेच परिपाठात शिक्षकांना सांगायला
आणि रोज रात्री आपल्या लाडक्या पोरा-बाळांना गोष्टी सांगणा-या आई-बाबांसाठी अतिशय उपयुक्त आहेत !

पोट धरुन हसायला चला तर जाऊ या, या शेखचिल्लीच्या फुल्ल २ धम्माल राज्यात.....



लेखक- आबा गोविंदा महाजन
पृष्ठे- ५६
किंमत- साठ रुपये मात्र.


दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
Email- diliprajprakashan@yahoo.in
दूरध्वनी- ०२०- २४४८३९९५- २४४९५३१४

Thursday, January 19, 2012

नांदा `सख्य` भरे

घराघरात, जवळजवळ रोज होणारी नवरा-बायकोची भांडणं थांबली तर जगात किती शांतता नांदेल!

पण प्रश्न असा आहे.. नवरा-बायको भांडतात का?

त्याचं उत्तर असं आहे.. नवरे `मंगळा` वरुन आलेले असतोत..तर बायका `शुक्रा`वरुन!

दोघांच्या वागण्या-बोलण्यात जमीन आसमानाचा फरक असतो.
तो समजून घेतला तर अक्षरशः जादू होऊ शकते.
म्हणजे भांडणे संपतील असं नाही.. पण प्रेमानं भांडावं कसं? हे नक्की कळू शकेल..

अगदी सहज हसत-खेळत ही कला तुम्हाला शिकविणारं खुसखुशीत नाटक...


नांदा `सख्य` भरे

लेखक- शिवराज गोर्ले
पृष्ठे- ८२
किंमत- ऐंशी ऱुपये.


मुखपृष्ठ- हेमंत देशपांडे.

Tuesday, January 17, 2012

उपयोगातील वास्तुशास्त्र

आपण ज्या वास्तुत राहतो;
त्या वास्तुतील आपले वास्तव्य हे सर्व कुंटुंबियांना
मानसिक आर्थिक, शारीरिक, कौंटुंबिक सौख्य समृध्दी देणारे व्हावे,
यासाठी पारंपरारिक वास्तुशास्त्रातील
काही सरळ, सोपी सूत्रेही फार उपयुक्त ठरतात.

मग, त्यासाठी प्रत्येक वेळेला नवीन घरच घ्यायला पाहिजे असे नव्हे तर,
आहे त्या वास्तुतही आपण बदल करु शकतो.
आपले घर असो, दुकान की कारखाना
अगर ऑफिस वास्तुशास्त्राचा उपयोग केल्यास नक्कीच आपण यशाच्या शिखरावर जाल.

त्यामुळे हे पुस्तक खचितच आपल्या आयुष्यात क्रांती घडवेल.

समाजातील लोकांना जादा समाधानी राहता यावं,
त्यातील एक भाग म्हणून हे पुस्तक एक पाऊल पुढे ठरेल.

लेखिका- अंजू सोनी
पृष्ठे- १०४
किंमत- रुपये ऐंशी फक्त.
मुखपृष्ठ- भारती पाडेकर

Sunday, January 15, 2012

गोर्लेगिरी


आजकाल `गांधीगिरी`चा जमाना आहे.
वासूगिरी, चमचेगिरी...मागे पडलीय.
`गांधीगिरी` करायला एकदम सोपी.
कुणी सिग्नल तोडला की
ट्रॅफिक पोलिसानं गुलाबाचं फूल द्यायचं
आणि म्हणायचं, “निय म पाळा ना गडे”.
आणि ही `गोर्लेगिरी`..
पोलिसानं म्हणायचं, “धन्यवाद सर.
तुम्ही गुन्हे करता म्हणून आमचं पोटं चालतं.
पावती फाडू की मिटवामिटवी करताय?”
अशी `गोर्लेगिरी` इथे पानोपानी `भेटेल`.

गालातल्या गालात हसवून
तुमची `तबियत` खूश करून टाकेल,
निर्मळ मनोनं वाचलीत तर !

तेव्हा वाचा आणि ठरवा,
तुमचं मन निर्मळ आहे की नाही !




लेखक- शिवराज गोर्ले
पृष्ठे- १७४
किंमत- एकशें सत्तर रूपये.
मुखपृष्ठ- सुहास चांडक