Saturday, January 21, 2012

मृत्यू नंतरचे जीवन..

मृत्यूनंतरच्या अदभूत जीवनाचे रहस्य



माझा बेंगलोरचा मित्र सांगू लागला..
बंगलोर येथे हा घडलेली खरीखुरी हकीगत आहे. आमच्या शेजारी शामराव नावाचे एक व्यापारी राहात. त्यांचा व आमचा चांगला घरोबा होता. त्यांची पत्नी अपघातामध्ये दगावली. तिला सात वर्षाचा एक मुलगा होता. नंतर त्यांनी दुसर लग्न केले. योगायोगाची गोष्ट अशी की दोन वर्षांनी शामराव सुध्दा मोटार अपघातात निधन पावले. त्यांची अफाट संपत्ती होती. त्यांच्या मुलगा मनीष माझ्याकडे नेहमी यायाचा. शामराव जाऊन फक्त आठ दिवस झाले होते. मनीष मला म्हणाला...
काका, मला स्वप्नात बाबा दिसले. मी, आई व बाबा फिरायला गेलो आहोत. मी व आई बगीच्यामध्ये बेंचवर बसतो. आई मला पेढे खायला देते. पण बाबा ओरडून सांगतात की, मनीष, हे पेढे खाऊ नकोस. बाबा परत परत मला पेढे खाऊ नकोस म्हणून सांगत असतात व मी जागा होतो.
`मनीष, हे बघ जर तुला आईने कुठेही पेढे दिले तर मुळीच खाऊ नकोस. ते मला आणून दे. मी तुला मिठाईचे बॉक्स देईन`.
माझे वडील म्हणाले, ते पण मनीषचे बोलणे ऐकत होते. मला पण वडिलांचे म्हणणे पटले. मनीषला धोका असल्याची कुठेतरी पुसटशी जाणीव झाली.
आश्चर्य असे की त्याच दिवशी संध्याकाळी त्याच्या आईने त्याला बगीच्यात नेले व पेढे दिले. मनीषने ते न खाता गुपचूप खिशामध्ये ठेवले. त्याची आई त्याला पेढे देऊन हळूच निघून गेली होती. मनीष आमच्या घरी आला व त्याने ते पेढे माझ्या वडिलांकडे दिले. ते पेढे प्रयोगशाळेत पाठविण्यापूर्वी दोन पेढे रस्तावरच्या बेवारशी कुत्र्याला घालून पाहिले, तेव्हा ते कुत्रे पेढे पहिल्यांदा खाईना. जरा वेळाने त्याने खाल्ले पण काही तासामध्ये ते कुत्रे मेले. पेढ्यांमध्ये विष होते हे सिद्द झाले.
स्वप्नात येऊन त्याच्या मयत बापाने त्याला सूचना केली व आपल्या मुलाचा प्राण वाचवला.

मेलेल्या व्यक्तीचा आत्मा आपल्या आवडीच्या आप्त मंडळीत अडकलेला असतो. ते कधी कधी स्वप्नात य़ेऊन त्याला हितकारक सूचना करतात. जर कुणी अडचणीत सापडले तर त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात.

(पुस्तकातील `स्वप्नातील मृतात्मे`... यातील हा काही भाग..)

लेखक- डॉ. किशोरी सुरेंद्र पै
प्रा. महेश सुरेंद्र पै
पृष्ठे- ७८
किंमत- साठ रुपये फक्त
मुखपृष्ठ- विजय मराठे

No comments:

Post a Comment